आता अप्पाजी नाहीत, आपण एकट्या आहोत. यानं काहीतरी अडचण होतीये असा पुसटसाही विचार कसा शिवतो हिच्या मनाला ? तुम्ही दोघ असतात तर गोष्ट वेगळी असं कसं म्हणू शकते ती ? वयाच्या, मनाच्या आता इतक्या प्रौढ टप्प्यावरचे आपण बाई-पुरुष एखादी रात्रसुद्धा मोकळ्या मनानं एका छपराखाली घालवू शकत नाही ? बाहेरच कोणी काही म्हणणं तर दूरच; पण आपलं आपल्यालाही ते प्रशस्त वाटत नाही, पहिल्या संधीला या कोंडीतून सुटायला बघतो आपण, यात काय बरं आणि काय खरं ?
please login to review product
no review added