“‘निळासावळा’, ‘पारवा’ व ‘हिरवे रावे’ हे जी. ए. यांचे पहिले तीन कथासंग्रह... या सार्या कथांतून जी. ए. जीवनाची अस्तित्वमात्रता, त्याची अटळता, त्याची अर्थरहितता, असंबध्दता आणि त्यातील कार्यकारणहीनता हे सारे तर उभे करतातच, पण त्याबरोबरच आपण जिला सहजप्रवृत्ती म्हणतो, वासना किंवा प्रेरणा म्हणतो त्या शक्तीने मानव हे जीवन कसे जगू व बदलवू पाहतो याचेही अनन्य दर्शन घडवितात. एका बाजूला अनेक रंग, आकार, ध्वनी आदींनी पसरलेले हेतुहीन, आंधळे, सामर्थ्ययुक्त विश्र्व व दुसर्या बाजूला मानवी मूलप्रेरणा... यांच्यातील अत्यंत गुंतागुंतीची नाती व भाऊबंदकी तर जी. ए. दाखवीत नाहीत ना?... काम, क्रोध, व्देष, क्षुधा, खून, आत्मनाश यांनी अकस्मात पेटून निघणारी व तितक्याच आकस्मिकपणे विझून जाणारी माणसे जी. ए. यांच्या कथेत पुन:पुन्हा दिसतात.” - डॉ. द. भि. कुळकर्णी (‘पार्थिवतेचे उदयास्त’मधून)
please login to review product
no review added