छोट्या, सामान्य माणसांच्या आयुष्यातही खूप काही घडत असतं. भव्यदिव्य नसेल, चित्तथरारक नसेल, रोमहर्षक नसेल पण माणसामाणसांच्या नात्यातले ताण, चकवे, तिढे आणि बरचं काही कोणाला चुकलंय ? विशेषतः सामान्य संसारिकांना तरी ?
मंगला गोडबोले ह्यांच्यासारख्या ललितरम्य लेखानशैली लाभलेल्या लेखिकेला ह्या भावभावनांचे कंगोरे जाणवतात तेव्हा...
खुणेची जागा ह्यासारखा मनोज्ञ कथासंग्रह सिद्ध होतो. वाचकाला आपापल्याभावविश्वातल्या अनेक खुणेच्या जागा नकळत भेटवून जाणारा आणि नव्या खुणेच्या जागा शोधायला उद्युक्तही करणारा !
please login to review product
no review added