.“तुझा आवडता राग कोणता?" भीमण्णांनी मला विचारले. मी 'मालकंस' हे उत्तर देताच ते मालकंस गाऊ लागले.केवळ माझ्यासाठीच बाहेर पडणारे ते स्वर कानांवर पडू लागले. त्या स्वरांची व त्यांच्या छातीच्या कंपनांचीही मला जाणीव होऊ लागली. आपण 'मालकंसाच्या उगमापाशीच आहोत' असे वाटून मन आनंदाने भरून गेले! परत पहाटे 'आसावरी तोडी'च्या कोमल स्वराने जाग आली आणि त्या स्वर्गीय सुरांनी मनावर परत सुखाची साय दाटली. भीमण्णा कधी उठून गेले, ते कळलेच नाही. मागे राहिले होते, ते सूर व त्यांच्या कपड्यांवरील अत्तराचा वास!
please login to review product
no review added