एकूणच मानवी जगणं एखाद्या विचारशील माणसानं आपल्या लोलकात घेतलं आणि त्यातल्या विविध रंगांची विविध परावर्तनं आणि त्यातल्या रंगांच्या विविध गुंफणी यांना आपल्या समंजस शब्दांमध्ये अचूक पकडून एका पटावर मांडलं, तर जे होईल, ते हे पुस्तक आहे. माणसांमधून व्यक्त होणारं मानवी जग, कलांमधून व्यक्त होणारं मानवी जग आणि पुस्तकांमधून व्यक्त होणारं मानवी जग यांचा समेळ मनोहर सप्रे यांनी आपल्या सम्यक नजरेच्या लोलकात घेऊन, त्यांच्यातल्या सुसंगती आणि विसंगतीतले असंख्य रंग आणि त्या रंगांमधून व्यक्त होणारे खरे अर्थ-अनर्थ उलगडून दाखवून माणसांचं जगणं वैविध्यातूनसुद्धा कसं विशाल एकतेकडं आणि उदात्ततेकडं नेता येईल याचं मनोज्ञ आकलन या पुस्तकात मांडलं आहे.
please login to review product
no review added