’मण्यांची माळ’ हा सुनिता देशपांडे यांचा दुसरा लेखसंग्रह- ’सोयरे सकळ’ या संग्रहानंतरचा जीवन व्यतीत होत असताना होणा-या जाणिवांचे मनोज्ञ दर्शन, संवेदनाच्या आणि भावनांचया अंगाने आतापर्यतच्या त्यांच्या ललित लेखनातून होत आले आहे. आजवरच्या मराठीतल्या ललित लेखनाच्या निर्मितीचे दृश्य बघताना, त्यातल्या इरावती कर्वे, दुर्गा भागवत, गो. वि. करंदीकर यांच्यापासून, माधव आचवल, श्रीनिवास विनायक, वासंती मुझुमदार आदींच्या लेखनातून, असा संवेदनांचा, भावनांचा आविष्कार दिसतो. सुनीता देशपांडे यांचे लेखन या परंपरेला धरून स्वत:च्या वेगळ्या वाटेने निघाल्याच्या खुणा ’सोयरे सकळ’मधे दिसू लागतात. ’मण्यांची माळ’मध्ये त्या खुणा अधिक स्पष्ट होतात. संवेदना आणि भावना यांच्या अंगाने लिहीत असताना, त्यांत सुनीताबाईंच्या लेखनातली विचारगर्भता एकरस होऊन जाते आणि ललित लेखनाचे एक नवे रसायन निर्माण होते. ’मण्यांची माळ’ हे पुस्तक म्हणजे स्वत:च्या वेगळेपणाने साकारलेले, विचारगर्भ ललित लेखन आहे.
please login to review product
no review added