दुसरं महायुद्ध म्हणजे संघर्ष आणि संहार...! या अग्निकुंडात कोट्यावधी माणसांचा बळी गेला आणि त्याहून कितीतरी जास्ती माणस जखमी झाली. या भयानक युद्धानं सर्वसंहारक अण्वस्त्राना जन्म दिला आणि साऱ्या मानवजातीची शांती हरवून टाकली. अनेक बऱ्यावाईट नररत्नांनी आपल्या भल्याबुऱ्या कृत्यांनी जगाची उलथापालट करून सोडली. त्यांच्याच या कडूगोड कहाण्या. अशीच एक रोमहर्षक कथा म्हणजे पोलीश कॅम्प! कोल्हापूरजवळच्या वळीवडे या छोट्या गावात पोलंडमधून आलेल्या साडेपाच हजार निर्वासित पाच वर्षे राहिले. त्यात बहुसंख्य होत्या तरुण मुली! या गोऱ्यापान यौवनाने भावविश्वच बदलून गेलं, झपाटून गेलं. ही सत्यकथाही इतर कथांसारखीच अंतःकरणाला स्पर्श करून जाणारी... काळजाला हात घालणारी!
please login to review product
no review added