• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Chhava (छावा )

  Continental Prakashan

 861

 

 ₹500

 Paper Back

 808 Gm

 3

 3


‘राजा शिवाजी’ हा निर्विवाद सिंहपुरुष होता.परंतु शिवपुत्र ’संभाजी’ हाही एक छावाच होता.महाराष्ट्राला हे नव्याने;पण पुरेपूर उमजले आहे.‘छावा’च्या जोरदार स्वागताने ते सिद्ध्ही झाले आहे.एक-दोन नव्हे;तर एकाचवेळी पाच आघाडयांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंधर!मराठयांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव ’संभाजी’च होऊन गेला.जंजिरेकर सिद्दी,गोव्याचे फिरंगी,मुंबईचे टोपीकर आणि तीस लाखांची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठयांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब- या चार त्या आघाडया.पाचवी आघाडी होती,स्वार्थांध स्वजनांची,अगदी घरचीच!विखारी विश्र्वास घातक्यांची!रणांगणाचा वाघ सतत नऊ वर्षे पाठीशी घेतमुलूखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येताना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि ‘बुधभूषणम’ काव्याची रचना करुन तो कविराज म्हणून मान्यता पावावा;हे पाहिले की,प्रतिभा देवदत्त असली;तरी एक अजब आणि विस्मयकारी देणगी आहे,असे म्हणावे लागते.तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्रा ल्याले की,मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते;हे या छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका तर खरीच;पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update