कॅथलीनचा तो एक छंदच आहे. स्वत:ला सगळीकडून न्याहाळण्याचा. गंमत म्हणजे प्रत्येक वेळी त्या आरशात तिला आपलं रूप वेगळंच दिसतं.... स्वत:चं असं वेगवेगळं रूप बघताबघता ती अनेकदा भूतकाळात हरवून जाते. लहानपणच्या आशा-आकांक्षा, आपली जुनी स्वप्नं, यातलं काय आपण पुरं केलं, काय राहून गेलं, याचा शोध घेत राहते.... अलीकडे आरसे तिचे मित्र बनलेत आणि आपल्या मनोरंजनासाठी आरशाचे हवे तसे खेळ करायलादेखील ती शिकली आहे. आरसा निर्लेप असतो, आपणच त्यात आपल्याला हवं तसं प्रतिबिंब पाहू शकतो, हे आतां तिला उमजलेलं आहे.
please login to review product
no review added