हा आजारी पडला, तर अमेरिकेची अर्थव्यवस्था काळवंडून जायची आणि हा प्रसन्न झाला, तर अनेक देशांत दिवाळी साजरी व्हायची. कित्येक राष्ट्रप्रमुख, उद्योगपती याच्या कृपाप्रसादासाठी तासनतास तिष्ठत बसायला तयार असायचे. हा शेख अहमद झाकी यामानी. सौदी राजघराण्याशी संबंधित. उच्चविद्याविभूषित तरुण. ‘ओपेक’, ‘ओआपेक’सारख्या संघटनांचा पस्तीस वर्षांहूनही अधिक काळ सूत्रधार राहिलेला तज्ज्ञ. कार्लोससारख्या कुप्रसिध्द दहशतवाद्यालाही शह देऊ शकणारा सौदी तेलमंत्री. तेलाच्या अर्थकारणाचा व जागतिक राजकारणाचा रागरंगच पालटवून टाकणारा एक अवलिया. एक अफलातून तेलिया. त्याची ही कथा… डोळे दिपवणारी आणि तरीही अस्वस्थ करणारी
please login to review product
no review added