शेल्फमध्ये ठेवलेला पृथ्वीचा ग्लोब बघत असताना पृथ्वीच्या दोन्ही टोकांवरचे प्रदेश विशेष लक्ष वेधून घेतात. ते म्हणजे, दक्षिणेकडचा अंटार्क्टिका तर उत्तरेकडचा आर्टिक. एक बर्फ सोडला तर या देशांमध्ये बघण्यासारखं काय बरं असेल असा प्रश्न मनात येतो. तब्बल ७८ देशांची ऑफबीट भटकंती करणारं प्रधान दाम्पत्य या प्रदेशांचीही मुशाफिरी करून आलं आहे. जगाच्या दोन ध्रुवांवरच्या अशा स्थळांची वैशिष्ट्यं टिपून तेथील निसर्गाचं आणि लोकजीवनाचं जिवंत चित्रण ते या पुस्तकातून करून देतात. पृथ्वीच्या दक्षिण टोकावरील शेवटचं गाव ‘प्युर्टो विल्यम्स’, खलाशांचं कबरस्तान ‘केप हॉर्न’, ९८% बर्फानेच वेढलेलं ‘अंटार्क्टिका’, अवघ्या तीन हजार लोकवस्तीचं ‘फॉकलंड आयलंड’, तर उत्तर टोकावरील ‘आर्टिक सर्कल’, ‘नॉर्दन लाईट्स’चं मनोहारी दर्शन, हिमनगांची जागतिक राजधानी ‘ग्रीनलँड’ आणि लँड ऑफ फायर अँड आईस ‘आइसलँड’... पृथ्वीवरच्या अशा दोन टोकांवरील वेगळ्या दुनियेची सफर प्रधान या पुस्तकातून घडवून आणतात. थरारक सफरींचा अविस्मरणीय अनुभव देणारं कथन...एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती !
please login to review product
no review added