’भिंगरीची गती’ ह्या प्रकरणात भौतिक सुखसोयींची कमाल मर्यादा गाठण्याच्या प्रयत्नात अमेरिकेचे जीवन काय बेफाट वेगाने धावते त्याचे वर्णन लेखकाने केले आहे. पैसे टाकले आणि बटन दाबले की सुटी नाणी, पोस्टाची तिकिटेच काय, पण तहान लागली असेल तर कागदाचे ग्लास भरुन पेप्सिकोलाही मिळतो! खूप वेळ काम करावयाचे, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करावयाच्या युक्त्या शोधून काढावयाच्या, जास्तीत जास्त उत्पादन करावयाचे आणि जास्तीत जास्त पैसा मिळवून फावल्या वेळात जास्तीत जास्त मजा करायची, असा अमेरिकन जीवनाचा झपाटा श्री. दळवी ह्यांना दिसला.अमेरिका हे एक अत्यंत तरुण राष्ट्र आहे ही गोष्ट लक्षात घेतली की सहज संगती लागते. खूप काम करण्याची धमक आहे. खूप मिळवण्याची इच्छा आहे. खूप मिळवलेले खूप देण्याचे औदार्य आहे आणि खूप खुळेपणाही आहे!
please login to review product
no review added