ज्या व्यवस्थेत माणसाचा आत्मसन्मान, त्याची प्रतिष्ठा या गोष्टी राखल्या जातात, माणुसकी जपली व संवर्धित केली जाते, स्त्री-पुरुष हा भेद विषमतेसाठी, शोषणासाठी केला जात नाही, जेथे व्यक्ती स्वतंत्र व समान आहे, जेथे पृथ्वीच्या पर्यावरणीय व्यवस्थेचा आदर केला जातो, पर्यावरणाची जपणूक व संवर्धन केले जाते, जेथे मानवी लोकसमूहांच्या वैशिष्टयपूर्ण जीवनशैली व संस्कॄतींना सन्मानपूर्वक अवकाश राहिलेले असेल आणि जेथे माणसामाणसांमधील नाती ही बंधुभावाची, आत्मीयतेची, एकमेका साहय करण्याची असतील अशा एका नवसमाजाला निर्माणाचे ध्येय बोकील बाळगतात. हा त्यांचा पक्ष आहे. या अर्थाने आर्थिक विकास, प्रगती. आधुनिकता, समॄद्धी यांची आज जी शिष्टमान्य प्रतिमाने वा धारण आहेत त्यांना विकल्प शोधण्याच्या, निर्माण करण्याच्या, हे विकल्प रुजविण्याच्या पक्षात ते आहेत. आर्थिक विकास, प्रगती, आधुनिक. समॄद्धी या सगळयांच्या परिणामी माणसांचे काय होते, जास्त सुसंस्कॄत, प्रेमळ, नि:स्वार्थी, स्वस्थ, माणुसकी संपन्न बनून एकमेकांशी ती नाती जोडतात की नाही हीच खरी मापनकसोटी आहे ही त्यांची धारणा असल्याचे लेखांमधून प्रकट होत राहते.
please login to review product
no review added