मराठ्यांच्या या युद्धतंत्राची प्रेरणा घेऊन हिंदुस्थानात १८५७ चा उठाव झाला जगातील ४२ गुलाम राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळविण्याची प्रेरणा आणि ताकद या शिवतंत्राने दिली. शिवतंत्राचा उपयोग करून जी राष्ट्रे स्वतंत्र झाली त्यामध्ये क्युबा, व्हिएतनाम, जर्मनी, जपान अगदी शेजारील बांगलादेशही आहे. व्हिएतनामचे गुरिल्ला वार, जर्मनीची ब्लीट्स क्रिग, जपानची छापामारी, माओत्सोतुंगचा स्वातंत्र्य लढा ही सर्व शिवछत्रपतींची गनिमी काव्याची आधुनिक रूपे. म्हणून खऱ्या अर्थाने मराठ्यांचे युद्धतंत्र जागतिक कीर्तीचे आहे. या देशातील क्रांतीकाराकांनी जेव्हा सशस्त्र क्रांतीचा लढा उभारायचे ठरविले तेव्हा त्यांच्या समोर एकच नाव, एकच प्रदेश आणि एकच युद्धतंत्र होते. ते म्हणजे शिवशंभू छत्रपती, महाराष्ट्र आणि मराठ्यांचा गनिमी कावा. शंभूराजांच्या २०० व्या जयंतीचे (१४ मे १६५७) अवचीत्य साधून या देशातील क्रांतिकारकांनी पहिला उठाव केला. तो म्हणजे १८५७ चा राष्ट्रीय उठाव. आणि हाच गनिमी काव्याचा वणवा पेटता ठेवून आझाद हिंद फौज आणि इतर संघटनांनी मिळून पुढील नव्वद वर्षात हा देश स्वतंत्र केला आणि म्हणून या देशाच्या स्वातंत्र्याचे प्रेरणास्थान आणि यशस्थान जर काय असेल तर तो मराठ्यांचा गनिमी कावाच. आता याच गनिमी कावा युद्धतंत्राचा उपयोग जगातील प्रगत ३५ राष्ट्रांमध्ये केला जातो. आपण या शिवतंत्राचा उपयोग आजही आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी निश्चित करू शकतो.
please login to review product
no review added