मधुमेह झाला की रोगी अॅलोपॅथी औषधांकडे धाव घेतात. ती महाग तर असतातच कारण ही औषधं हा झाला वरवरचा उपाय. मधुमेहाला आळा बसवणारे अनेक नैसर्गिक उपाय आहेत हे किती जणांना ठाऊक असतं? या उपायांनी मधुमेहाचे दुष्परिणाम कमी करुन चांगले आरोग्य आणि कार्यक्षम जीवन निश्चितच साध्य करता येतं. नामांकित निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी लिहिलेलं हे पुस्तक शरीराचं उत्तम पोषण, आरोग्यदायी जीवनसरणी, आधुनिक निदान-साधनांचा योग्य वापर आणि व्यक्ती तितक्या प्रकृती याची मनोमन जाणीव या चतु:सूत्रीवर आधारलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला औषधापलीकडचे उपाय देतं. अद्ययावत ज्ञान-माहितीवर आधारलेल्या या पुस्तकात मधुमेहाची विस्तृत माहिती देऊन अनेकविध प्रश्नांच्या मुळाशी जाऊन निराकरण केलेले आहे. यातील पथ्ये व सूचना यांच्या साहाय्याने मधुमेहापासून संभवणार्या दुष्परिणामांचा धोका टाळता येईल. काही सूचना प्रारंभी तशा थोडया कठीण वाटल्या तरी लवकरच आपणाला हे मानवते आहे असे दिसून येईल. थोडक्यात सांगायचं तर या पुस्तकात आहे.... 0 प्राथमिक माहिती 0 आरोग्यदायी पर्याय 0 फलदायी उपाय!
please login to review product
no review added