जेव्हा मला बघितले, माझ्या आईला मला पाजताना पाहिले, तेव्हा गुणा आईला कसनुसे वाटले. कधी नाही ते आपल्या हातून घडावे, असे वाटले. ते तिच्यात कधी नव्हते, ते एकाएकी उफाळून आले. तिचे स्त्रीत्व झडझडून उठले आणि त्या नव्या अनुभूतीने माझी गुणा आई फार बैचेन झाली; पण आता फार उशीर झाला होता. मग एके दिवशी तिने काही ठरविले आणि आठ दिवस काही न खाता-पिता, न बोलता ती रानातल्या झोपडीत पडून राहिली. विहिरीत पडून किंवा अन्य मार्गाने मरून तिने माझ्या बापाला आणि गावाला धोक्यात आणले नाही. सांगून-सवरून ती शांतपणे रानातल्या झोपडीत राहिली आणि मरून गेली.
please login to review product
no review added