महाराष्ट्राचे शिल्पकार' या योजने अंतर्गत अहिल्यादेविच्या चरित्राची दुसरी आवूर्त्ती निघत आहे. अहिल्यादेवीने आपल्या कर्तुत्वाने महाराष्ट्रात नव्हे तर भारतात आपला ठसा उमटवला. १७२४ च्या सुमारास अहिल्या देवींचा जन्म झाला.जन्मापासून १७३३ पर्यंत आई-वडिलांच्या घरी बाल्यावस्था गेली. १७३३ मध्ये विवाहानंतर घरची सेवा चालू होती.१७५४ मध्ये सुरजमल जाटची लढता लढता कुंभेरच्या लढाईत अहिल्यादेवींचे पती युद्धात मारले गेले. १७६६ मध्ये सासरे मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. १७६६ ते १७९९ त्यांच्या जीवनातील स्वयंकर्तुत्वाचा आणि भारतीय महिलेच्या महान मुत्सद्देगिरीचा न्यायनिपूण नितीचा धैर्यशाली धोरणाचा गौरवशाली कालखंड होता.
please login to review product
no review added