आयुष्यात जोपासलेल्या साहित्य-संगीत कला-निसर्गातील भटकंती यासारख्या विविध छंदातून त्या त्या क्षेत्रातील काही नामांकित व्यक्तींशी परिचय होत गेला.कुतूहलाने त्या त्या व्यक्तींमधील सुप्त कलागुणांचा मागोवा घेता घेता मी त्यांच्यात अधिकाअधिक गुंततच गेलो.त्यांच्या सान्निध्यांत घालविलेल्या क्षणांनी अपार आनंद देत माझे आयुष्य संपन्न केले आहे. या साऱ्या क्षणांची स्पंदने अक्षरबद्ध करण्याचा प्रयत्न केला व त्याचे संचित म्हणजेच 'वलयांकित'!'वलयांकित'मधील मला भावलेली सारीच व्यक्तिमत्त्वे स्वतेजाने झळकणारी.मी फक्त अक्षरांच्या माध्यमातून रसिकांपुढे त्या व्यक्ती मांडण्याचा प्रयत्न केला, एवढीच माझी छोटीशी भूमिका आहे.
please login to review product
no review added