युरोप, अमेरिकेतील अनुभव आण माहिती सांगणारे लेख, पुस्तके आपण वाचत असतो; पण आखाती देशांची माहिती आपल्यापर्यंत फारशी पोहचत नाही. हि उणीव डॉ. उज्ज्वला दळवी यांनी काही प्रमाणात भरून काढली आहे. सौदी अरेबियासारख्या देशात डॉक्टरकी करणाऱ्या डॉ. दळवी यांनी सौदी अरेबियावरचा गुढ बुरखा बाजूला करून त्या देशांच जवळून दर्शन घडवलं आहे. विशेष म्हणजे सौदीचं ग्रामीण जीवन त्यांनी उलगडलं आहे. कट्टर इस्लामी देशातील सामाजिक स्थिती, स्त्रियांना असलेलं दुय्यम स्थान, वाळवंट, उंट, पाण्याचं दुर्भिक्ष्य आणि गडगडाटी पाऊस, वाळूची वादळं आणि बोचरी थंडी असं बरंच काही आगळं पुस्तकात वाचायला मिळतं
please login to review product
no review added