"प्राचीन मराठी वाङमयाचं विडंबन १९६७ साली मौज दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या पु.ल.देशपांडय़ांच्या लेखाचं हे पुस्तकरूप! पुलंनी ह्यात प्राचीन मराठी वाङमयाच्या इतिहासाचं आपल्या अजोड विडंबन शैलीत निखळ विनोदी कथन केलं आहे. मराठी भाषेच्या पूर्वपीठिकेपासून सुरूवात करून चक्रधरस्वामी, महानुभाव पंथ, ज्ञानेश्वर आणि १३व्या-१४व्या-१६व्या शतकातले ग्रंथकार, संत आणि पंत कवी, शाहीर इत्यादींचा परामर्श त्यांनी ह्यात घेतला आहे. तो वाचताना वाचकांना हासू आल्याशिवाय राहत नाही. पुलंच्या लेखणीचा महिमा पटवणारं हे पुस्तक म्हणजे पुलंप्रेमी वाचकांसाठी मेजवानीच आहे. "
please login to review product
no review added