लेखक ज्या परिसरात जन्म घेतो आणि आयुष्यभर जिथे राहतो, त्या परिसराचे अक्षांश-रेखांश बिंदू त्याच्या साहित्याचे केंद्रबिंदू असणे हे त्याच्या साहित्याच्या श्रेष्ठतेचे पहिले लक्षण समजले जाते. या निकषावर प्रमोद बोरसरे यांची कथा मला महत्त्वाची वाटते. पूर्वविदर्भातील गडचिरोली-चंद्रपूर परिसरातील आदिवासी आणि भटके-विमुक्त
त्यांच्या कथांचे तपशील आहेत. पण या आदिम जमातींच्या सांस्कृतिक अस्तित्वाचा शोध घेणे हे त्यांच्या कथेचे खरे मूल्य आहे. वर्तमानकालीन बदलत्या सामाजिक मूल्यांच्या पार्श्वभूमीवर आदिम भटक्या विमुक्तांच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणारे कथाकार बोरसरे हे मला या संदर्भात महत्त्वाचे वाटतात. 'पारवा' या संग्रहातील प्रत्येक कथेचे हेच असाधारण वैशिष्ट्य आहे आणि म्हणून त्यांची कथा मराठी कथेत उठून दिसणारी आहे.
-प्रमोद मुनघाटे
please login to review product
no review added