विख्यात सरपतज्ञ श्री निलिम कुमार खैरे(अण्णा ) गेली चार दशके या क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या ते कात्रज येथील सरपोद्यान व रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर एनिमल्स, पुणे या दोन संस्थांचे संचालक असून "इंडियन हर्पिटॉलॉजिकल सोसायटी" या संस्थेचे संस्थापक आहेत. आज पर्यंत त्यांची सर्प, प्राणीसृष्टी या विषयांवर चार पुस्तके प्रकाशित झाली असून, या चारही पुस्तकांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या 'साप' पुस्तकाच्या या नवीन आवृत्तीत आपल्याकडे आढळणाऱ्या 57 सापांची माहिती रंगीत फोटोसह दिली आहे. याबरोबरच सर्प व सर्पदंश कसे टाळावेत, विषारी सर्पदंशाची लक्षणे, प्रथमोपचार अशी बरीच माहिती यात सांगितली आहे. साप ओळखण्यासाठी सोयीचे ठरू शकणारे तक्तेही दिले आहेत. उत्कृष्ट फोटो व सोप्या भाषेतील अत्यंत उपयुक्त माहिती यामुळे हे पुस्तक शेतकरी, बागायतदार, रानावनात फिरणारे ट्रेकर्स यांच्यापासून ते डॉक्टर या विषयाचे अभ्यासक या साऱ्यांना उपयोगी पडेल.
please login to review product
no review added