आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वत: अग्नी दिला.' शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. तारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात...प्रत्यक्षात शंभूराजे जिवंत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते. दुर्दैव फक्त एवढंच की शंभूराजांच्या वाटेवर काट्यांची रांगोळी काढण्यासाठी औरंगजेबही सज्ज होता. कारण शंभूराजांच्या मृत्यूवर औरंगजेबाला अजिबात विश्वास नव्हता. मुघली सैनिक, दरोडेखोर, गुप्तहेर, धन-दौलत, प्रतिष्ठा सारं काही त्यानं शंभूच्या शोधासाठी पणाला लावलं. उसाचा फड पेटवावा तसा सारा मुघली प्रांत पेटवून दिला. पण, साऱ्या मुघलांची धूळधाण उडवत शंभूराजे राजगडी पोहचले.कसे ?उत्तर हेचि शंभू
please login to review product
no review added