‘लेखन’ हे कधी आपण आयुष्याचे वेड बनविले आहे का? एखाद्या मुसलमानी गवयाप्रमाणे आपले आयुष्य कधी उधळून दिले आहे का? चोवीस तास आपण आपल्या नशेत राहिलो आहोत का? मुळीच नाही! आपण जीवन जगलो नाही; जीवन पाहिले नाही. कारण आपली हिंमत झाली नाही! जोपर्यंत आपण प्रतिष्ठा, धन, शाश्र्वती यांना सांभाळायचा प्रयत्न करीत आहोत, तोपर्यंत दिव्य-भव्य असे आपल्या हातून काहीच निर्माण होणे शक्य नाही. एखादा जबर माणूस व्याकरणाला लाथ मारील आणि भाषेला पुढे नेईल. एखादा कलावंत लौकिक नीतीला लाथ मारील, पण लोकांना अलौकिक नीतीचं दर्शन घडवील. दरोडेखोरही नीतीला ठोकरतो; पण दरोडेखोर समाजाला खाली नेतो आणि कलावंत समाजाला वर घेऊन जातो!
please login to review product
no review added