प्रवीण दवणे यांच्या गद्य-पद्य लेखनाची ही सुरेल मुशाफिरी. क्षेत्र कुठलेही असो; मान-अपमान, आशा-निराशा, यश-अपयश यांच्या ऊन्ह सावल्या येतातच. पण सतत तीस वर्षे अथक जिद्दीने दवणे यांनी चार पिढ्यांच्या संगीतकारांबरोबर गीतलेखन करताना त्यांच्या चिंतनाचे, सृजनप्रेरणेचे जे मर्मग्राही निरीक्षण केले, ते मराठी साहित्यात अपूर्व आहे. नामवंत-गुणवंत कलावंतांच्या सहवासात नेणारे हे ‘मैत्रबन’ आपणा सर्वांना सकारात्मक बळ देईल. त्यातून आपल्या कर्तृत्वाची, नव्या स्वप्नांची बीजे रुजतील; आणि आपल्या स्वत:च्याच आयुष्याचे एक सुरेल गाणे केव्हा होईल ते कळणारही नाही.
please login to review product
no review added