• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Telecom Kranticha Mahaswapna (टेलिकॉम क्रांतीचा महास्वप्न)

  Rohan Prakashan

 408

 978-81-932936-8-3

 ₹375

 Hard Bound

 548 Gm

 1

 1


सत्यनारायण गंगाराम पित्रोदा... ओडिशा राज्यातल्या तितिलगड या छोट्याशा गावातला हा तरुण ‘स्वप्नभूमी’ अमेरिकेत गेला काय आणि झपाट्याने विस्तारत जाणार्‍या तंत्रज्ञानाच्या अवकाशात त्याच्या हाती सोनं लागलं काय! सत्यनारायणचा ‘सॅम’ झाला आणि जागतिक पेटंट्सच्या मालकीमुळे कोट्याधीश बनला... पण गांधीवादी विचारांचा पगडा असलेल्या सॅमना मात्र आपलं ज्ञान आणि गाठीशी असलेला अनुभव आपल्या मायभूमीसाठी वापरावा अशी आस लागली. आणि म्हणून ते भारतामध्ये परतले, तेच एक ‘महाध्येय’ घेऊन... भारतात ‘टेलिकॉम-क्रांती’ घडवण्याचं ! तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचंही त्यांना समर्थ पाठबळ लाभलं... आणि मग केवळ एक रुपया वेतनावर अविरत कष्ट करणारे सॅम आणि देशाच्या कानाकोपर्‍यात दिसणारे ‘एसटीडी/पीसीओ बूथ’ म्हणजे एक अतूट समीकरणच होऊन गेलं...! राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर मात्र सॅम यांचं जगच हादरलं. भ्रष्टाचाराचे आरोप, त्यातच आलेला हृदयविकाराचा झटका आणि आर्थिक कफल्लकता यांमुळे ते खोल गर्तेत बुडाले, पण तरी निराश न होता फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा राखेतून उसळून वर आले...! भारतीय टेलिकॉम-क्रांतीचं महास्वप्न प्रत्यक्षात आणणार्‍या सॅम पित्रोदा यांची ही प्रेरक आत्मकथा !

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update