कॉन्स्टेबल नंजुण्डेगौडा गालातल्या गालात हसला. त्याच्या खेडवळ हास्यामधला मंद आणि जोराच्या हसण्यामधला नेमका फरक लक्षात आला नाही. ‘‘हसायला काय झालं?’’ सळ्यांच्या आड असलेल्या बी.ई.पर्यंतचं शिक्षण घेऊन उद्योगपती म्हणून स्थिरावलेल्या जयकुमारनं विचारलं. ‘‘यू आर माय कझिन!’’ बंगळूरमध्ये वाढलेल्या तिनं खेड्यातल्या त्या घराच्या परसात असलेल्या संत्र्याच्या झाडाखाली उभं राहून म्हटलं. ‘‘कुणी शिकवलं तुला इंग्लिश?’’ त्याने कठोरपणे विचारलं. तिच्या स्कुलमधल्या कुठल्याही मिसच्या नसेल इतक्या कठोर आवाजात. तिला राग आला. हा काय माझा टीचर आहे, एवढं बोलायला? ‘‘माझ्या मिसनं. माझ्या मम्मीनं! माझी मम्मी इंग्लिशची रीडर आहे!’’ ‘‘नीट समजून घे. मी तुझा कझिन नाही. ब्रदर आहे! भाऊ मोठा भाऊ! अण्णा.’’ ‘‘पण माझे डॅडीमम्मी वेगळे आहेत आणि तुझे अम्माअप्पा वेगळे आहेत...’’ तिच्या मनातली शंका फिटली नाही. ‘‘वेगळे असले म्हणून काय झालं? माझे अप्पा तुझ्या अप्पांचे मोठे भाऊ; म्हणून मी तुझा दादाच आहे, लक्षात ठेव. तुला इंग्लिश शिकवलंय त्यांना अक्कल नाही!’’ त्यानं मास्तरगिरी करत म्हटलं. भारतीय समाजाला जात असलेल्या तड्याचं दर्शन घडवत, हृदयाला पीळ पाडणारी; समकालीन जीवनासमोर आरसा बनून जीवनदर्शन घडवणारी कादंबरी.
please login to review product
no review added