चिरायू' हा चरित्रग्रंथ म्हणजे सद्गुरू भाऊ यांच्या लौकिक आणि आध्यात्मिक जीवनाचे यथातथ्य दर्शन घडविणारा एक स्वच्छ आणि पारदर्शक असा निर्मळ आरसाच आहे. सौ. वर्षा माचवे यांनी आ आत्यंतिक श्रद्धेने आणि चिकित्सक डोळसपणे हा ग्रंथ सिद्ध केला आहे. ओम सद्गुरू प्रतिष्ठान' या आध्यात्मिक केंद्राच्या निर्मिती पाठीमागील श्री दत्तसंप्रदायाचे गुरुपरंपरा प्राप्त सखोल अधिष्ठानही समजते. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रेमकृपेच्या आशीर्वादामुळे आणि सततच्या सूचक मार्गदर्शनामुळे सद्गुरू भाऊ यांचे व्यक्तिमत्व अंतर्बाह्य परिवर्तित होत गेले आणि तेज संपन्न झाले, हेही लक्षात येते. सर्व विश्वाला हा प्रसाद देण्यासाठी गुरुशिष्याचे रूप सगुण साकार झाले आहे. भावगर्भ शब्दामधून अविष्कृत झालेले हे चरित्र वाचकाला अंतर्मुख करते. या मार्गावरील साधकाला त्याच्या आध्यात्मिक वाटचालीत या चरित्राच्या वाचनाने नवा दिलासा मिळेल, नवी दृष्टी लाभेल असा मला पूर्ण विश्वास वाटतो.- डॉ . सई देशपांडे
please login to review product
no review added