टाटा समूहात आता जेआरडींची सत्ता नसून आपली आहे, हे सर्वांना दाखवून देण्याचं रतन टाटांनी ठरवलं असावं. जेआरडींनाही पटलं नाही, तरी आपलाच शब्द अंतिम राहील, हेही त्यांना दाखवून द्यायचं होतं. जेआरडींच्या मर्जीतल्या दिग्गजांच्या दृष्टीनं त्याचा अर्थ, जेआरडींनीच त्यांना देऊ केलेलं सर्वकाही गमावणं असा होता. या संदर्भात रतन टाटांनी पहिला प्रयोग माझ्यावर केला. मला वाटतं, रतन टाटा इतक्या तातडीनं आपल्या हाती प्रत्यक्ष कारभाराची सूत्रं घेतील, याचा अंदाज जेआरडींना आला नसावा…’
please login to review product
no review added