माणसाच्या आजच्या हव्यासात, वेडात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य केवळ चिन्तनातच आहे. माणसामाणसांत आज जो संघर्ष दिसत आहे, त्याचा अंत करण्याच्या आड जर काही येत असेल तर ते म्हणजे, माणूस हा अनेक सिद्धांतांच्या व तत्त्वांच्या गुंताळ्यात अडकून पडला आहे हे होय. राष्ट्रीय किंवा धार्मिक विचारप्रणाली, तसेच स्वतःच्या मोठेपणाबद्दल त्याचा अट्टाहास, हाच माणसाचा नाश करीत आहे; ही नाशाची प्रक्रिया, हा न्हास, सर्व जगभर चालू आहे. सहिष्णुतेचा आव आणून हा नाश टाळण्याचा माणूस प्रयत्न करीत आहे; त्याचप्रमाणे विचारांची वरवर देवाणघेवाण करून परस्परांशी थोडेफार जुळते घेऊन आणि तात्पुरत्या व दिखाऊ उपायांचा अवलंब करून तोहा सर्वनाश टाळण्याचा प्रयत्न करीत आहे आणि तरीही तो स्वतःच्याच संस्कारबद्धतेच्या खोड्यात अडकून पडला आहे.चांगुलपणा हा जसा कुठल्याही मताभिमानात बसत नाही, तसाच तो तत्त्वे व सिद्धान्त यांच्याबद्दलच्या अहंकारातही बसत नाही, सिद्धांत हे सर्व प्रीतीचा अव्हेर करतात, तिला दूर लोटतात व चिन्तन म्हणजे तर प्रीतीची फुलोरा आहे, प्रीतीचा बहर आहे.
please login to review product
no review added