नरेंद्र ते विवेकानंद : एक झंझावत' या कादंबरीमय चरित्रलेखनानंतरचे दुसरे पुस्तक: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर' हे खरोखरच वाळवंटातील हिरवळीसारखा असल्याने त्यांच्या संशोधनाचा उपयोग पुढे अनेक पिढ्यांना होईल यात शंका नाही..एक अतिसामान्य गुलाम मुलगा बेदम कष्ट उपसून जागतिक किर्तीचा कृषितज्ज्ञ होतो, हा विक्रम कसा काय घडला हे सांगणारे प्रा. ढवळसर या चरित्रातून एक प्रेरणादायी संदेश देऊ इच्छितात, तो म्हणजे तरुण मित्रांनो! स्वतःला कमी समजू नका. मोठे होण्यासाठी अनेक मार्ग आहेत, त्यातून एक निवडा आणि जिद्दीने सामना करा. यश तुमचेच आहे.' हा संदेश अमलात आणण्यासाठी हे 'ओअॅसिस' सोबत असणे आवश्यक आहे
please login to review product
no review added