या जगात जी माणसं स्वकर्तृतवावर मोठी झाली, त्यांचा जीवनप्रवास खडतर होता. संघर्षाच्या आणि संकटांच्या मालिका त्यांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या. नियती त्यांची सत्वपरीक्षा घेत होती. तरीही मोडून न पडता ही माणसं संकटांवर स्वार झाली. जीवनाबद्दलची निष्ठा, प्रचंड ध्येयवाद, दुर्दम्य इच्छाशक्ती, अथक परीश्रम आणि सकारात्मक दृष्टीकोनाच्या बळावर त्यांनी मोठी झेप घेतली, म्हणून त्यांचा जीवनग्रंथ समृध्द आणि संपन्न झाला. इतरांसाठी तो प्रेरणादायी ठरला. या पुस्तकांचे वाचन करताना युवकांच्याही मनात आकांक्षा निर्माण होतील आणि मुलांना स्वत:चे एक कर्तृत्वशिखर खुणवू लागेल. मुलं मोठया हिमतीने आणि आत्मविश्वासाने त्या शिखरांच्या दिेशेने झेपावतील. असाध्य ते साध्य करता सायास या संत तुकारामांच्या तत्वज्ञानाची अनुभूती घेतील. त्यांचाही जीवनग्रंथ देखणा होईल. हे सारे घडावे यासाठीच हा लेखन प्रपंच.
please login to review product
no review added