दया पवार यांच्या ‘बलुतं’ दलित आत्मकथांना सुरवात झाली. त्यानंतर आलेल्या आत्मकथनांमुळे दलितांचे जीवन सर्वांसमोर आले. आज शिक्षण, नोकरी यामुळे दलित समाज स्थिरस्थावर झाला आहे. तरी त्यांच्यावरील अन्यायाच्या बातम्या येतच असतात. दलित स्त्रीचे पूर्वीपासूनचे जगणे हे अवघडच होते. दलित म्हणजे काय याची जाणीव झाल्यापासून एक स्त्री म्हणून जे जगणे आले, त्यातून तावून सुलाखून निघाल्यानंतरचे आयुष्य ऊर्मिला पवार यांनी ‘आयदान’मधून मांडले आहे. दलित ग्रामीण स्त्रीचे जीवन यातून समजते.
please login to review product