प्रसाद हा अतिविकलांग मुलगा. कोपरापुढे हाताची होणारी मंद हालचाल आणि कुशाग्र बुद्धिमत्तेची देणगी एवढीच त्याच्या शारीरिक जमेची बाजू. असा हा प्रसाद आपल्या इच्छाशक्तीने, कर्तृत्वाने केवळ एकवीस वर्षांच्या उण्यापुऱ्या आयुष्यात एक दंतकथा बनला. शिक्षण, गायन, वक्तृत्व, चित्रकला यातील त्याने केलेली कामगिरी आपल्यातील अपूर्णत्वाची जाणीव करून देते. प्रसाद म्हणजे निसर्गाचा अनाकलनीय आविष्कार. त्याच्या जीवनाची आणि त्याच्या आई-वडिलांच्या समर्पणाची ही कहाणी आहे.
please login to review product
no review added