2002 साली बी. बी. सी. ने '100 सर्वश्रेष्ठ ब्रिटिश' ( 100 greatest Britons) ठरवण्यासाठी जनमत घेतले. त्यात पहिल्या क्रमांकावर सर विन्स्टंन चर्चिल तर इसामबार्ड किंगडम ब्रूनेल हा दुसऱ्या क्रमांकावर होता. यात 100 जणांच्या यादीत ब्रुनेल नंतर चार्लस डार्विन, विलियम शेक्सपियर, सर आयझॅक न्यूटन आदी मान्यवरांची नावे आहेत. विविध प्रकारे पुलांची निर्मिती, जहाज बांधणी, रेल्वे निर्मिती अशा वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविलेला... ब्रुनेल! तो इंग्लंडचा सर्वश्रेष्ठ इंजिनियर होता... थोर विचारवंत होता. ते विचार कार्यान्वित करण्याची शक्ती त्याच्याजवळ होती. त्याकरिता तो योजना ऐकून त्या यशस्वीपणे राबवीत असे. व्यावहारिक जगाला तो खर्चिक (उधळ्या) वाटला ( कदाचित), तू तसा असेलही पण जे केवळ पैसा पैसा मोजत बसतात त्यांच्याकडून इतके मोठे कार्य होऊ शकत नाही. ब्रूनेलचा निकटवर्ती सहकारी डॅनियल गुचने ब्रूनेलविषयी असे गौरेवोदगार त्याच्या रोजनिशीत लिहून ठेवले. केवळ 53 वर्ष आयुष्य लाभलेल्या या महापुरुषाने जनकल्याणाची किती कामे केली त्याचा आलेख म्हणजे 'असा होता ब्रूनेल'.
please login to review product
no review added