१९४७ साल आहे आणि कित्येक वर्षांपूर्वी निवृत्त झालेला. आता ९३ वर्षे वय असलेला शेरलॉक होम्स आपल्या ससेक्समधील दूरस्थ फार्महाउसमध्ये एक हाउसकीपर आणि तिचालहान मुलगा यांच्या समवेत राहतो आहे तो आपल्या मधमाश्यांची निगा राखतो. आपल्या रोजनिशीत लिहितो आणि आपल्या मावळत चाललेल्या मानसिक कुवतीशी झुंजत राहतो. त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळीही लोक त्याच्याकडून आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची अपेक्षा करीत असतात. अशावेळी होम्स अशा एका प्रकरणाचा पुन्हा विचार करू लागतो. ज्यातून त्याला स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता निर्माण होते. जीवन, प्रेम, मनाच्या आकलनशक्तीच्या मर्यादा यांच्याबद्दल हे प्रश्न आपण विचारत आहोत, हेही त्याच्या लक्षात आलेलं नसतं. 'अ स्लाइट ट्रिक ऑफ द माइंड ही विलक्षण आकर्षक आणि साहित्यिक संवेदनशीलता दाखवणारी कादंबरी आहे. एका सर्वश्रेष्ठ काल्पनिक गुप्त पोलिसावरील ही कथा मानवी संबंधातील रहस्यांचा विस्मयकारक रीतीने शोध घेते.
please login to review product
no review added