आशा बगे यांच्या या दोन कादंब-यांत नव्या-जुन्या पिढयांतील माणसांचा आयुष्याकडे पाहण्याचा दॄष्टिकोन चितारताना मानवी नातेबंधांची उत्कट रूपे चित्रित होतात-ती जीवनाबद्दलच्या खोल चिंतनशील जाणिवेतून. ’भूमिका’मधले आजी-आजोबा आपल्या मुलीच्या पश्चात तिच्या मुलाला आपल्या संस्करांत वाढवताना, आपल्या सुखदु:खांचा अन्वयार्थ लावत आपले आयुष्य पुन्हापुन्हा नव्याने त्या दु:खासह समजून घेऊ पाहतात. प्रसूतितज्ज्ञ सुरू आणि साधी, संसारी पण संवेदनशील मनाची माधवी यांच्या मैत्रिबंधाची कथा ’उत्सव’मध्ये येते. दोघींच्या वाटयाला आलेल्या एकटेपणाचे रंग वेगळे-पण दोघींच्या मैत्रीतला धागा माणसांना दुभंगून टाकणा-या याच एकटेपणाचा. याच एकटेपणाने आयुष्याकडे समंजसपणे पाहण्याची दाखवलेली प्रगल्भ, स्वयंभू वाट... मानवी जीवनाचे, नातेसंबंधांचे विभ्रम या दोन कादंब-यांतून पुरेशी अलिप्तपणे साकारणारी आशा बगे यांची शैली व्यक्तिरेखांची व्यक्तिमत्त्वे, त्यांच्या आयुष्यासकट वाचकांसमोर जिवंत उभी करत जाते. त्यातले चिंतन वाचकांना विचार करण्याचा अवकाश पुरवत राहते.
please login to review product
no review added