तो साखर, गुळ, तांदूळ, याच्या पुड्या बांधायला लागला. शारदा पैसे घेऊन किराणा द्यायला लागली. त्याच्या येण्यामुळे बरीच मदत मिळाली.काही लोकांनी याद्या दिल्या होत्या. ते सामान त्यांच्या घरी पोहोचवायचं होतं पण ते या नवीन मुलाला द्यावं की नाही याचा ती विचार करत होती.शेवटी तिनं ठरवलं एवढ्यात कोणावर विश्वास ठेवायचा नाही. विश्वास, नरहरी आणि शाम या तिघांनीही विश्वासघात केला होता. पण चुक त्यांचीही नव्हती तिजोरी उघडी ठेवली तर लोक पैसे काढणारच. किती दिवस ते मनावर नियंत्रण ठेवणार? दुकान बंद करून शारदा घरी आली आणि एक आनंदाची बातमी समजली. बँकेचं पत्र आलं होतं. तिची निवड झाली होती. सोलापूरचीच शाखा तिला मिळाली होती. सोळाशे रुपये पगार मिळणार होता.आता काय करायचं?नोकरी करावी की दुकान चालवावं? शारदा विचार करायला लागली.
please login to review product
no review added