’एकम’ ही एका लेखिकेच्या एकटेपणाची कथा आहे. तिनं स्वत:शी केलेला एक संवाद. एकटेपणाशी एकटं होऊन केलेला. एका लेखिकेचा तिच्या सॄजनशील मनाशी घडत गेलेला, म्हणूनच तिच्या आयुष्याचा, लेखनाचा, तिच्या भाषेचा, स्त्री आणि पुरुष नात्याचा, मैत्र संकल्पनेचा हा एक सर्जनात्मक शोधही. त्यात आयुष्यापासून तुटत जाणं असलं तरी ते रुदन नाही, कारण एकटं करत नि होत, स्वत:ला नि आयुष्याला तटस्थपणे हे शोधत राहणंही आहे. आणि पुन:पुन्हा फिरून एकटंच होणं आहे. मिलिंद बोकिलांची याआधीची ’शाळा’ ही कादंबरी मोठया प्रमाणावर वाचकांना भावली. शालेय जीवनाचा-कुमारवयीन भावविश्वाचा नितळ, मुक्त आणि खळाळता आविष्कार त्यात होता. ’एकम’ ही कादंबरी मात्र गंभीर, चिंतनशील निर्मिती आहे. अव्यक्ततेतून बरंच काही व्यक्त करत वेगळया वाटेनं जाणारी. आणि मनाची पकड घेणारीही.
please login to review product
no review added