’प्रेषित’ (विज्ञान-कादंबरी) ही डॉ० ज़यंत नारळीकरांची मराठीतील दुसरी ललित सहित्यकॄती. (’यक्षांची देणगी’ हा त्यांचा विज्ञानकथासंग्रह मार्च १९७९ मध्ये प्रसिध्द केला आणि त्याला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला. ’यक्षांची देणगी’ची दुसरी आवॄत्ती आता ’प्रेषित’च्या बरोबर प्रसिध्द झाली आहे.) शिक्षित मराठी समाजात वैज्ञानिक दॄष्टिकोन रुजावा या हेतूने डॉ० नारळीकरांनी लेखणी हाती धरली आणि आता ते विज्ञानकथेकडून विज्ञानकादंबरीपर्यंत पोचले आहेत. या नव्या कथात्मक वाड्मयप्रकाराला मराठी साहित्यक्षेत्रात वाढती प्रतिष्ठा (मुख्यत: डॉ० नारळीकरांच्या विज्ञानसाहित्यामुळे) कशी मिळत आहे याचे एक गमक म्ह्णज़े अलीकडे मुंबई विदयापीठ आणि मराठी विज्ञान परिषद यांनी योजिलेला ’विज्ञानसाहित्य’ या विषयावरील परिसंवाद. (डॉ० नारळीकरांचे विज्ञानकथासाहित्य आता इंग्रजीतही प्रसिध्द होऊ लागले आहे.) डॉ० जयंत विष्णू नारळीकर हे कोल्हापुरात जन्मलेले (एकोणीस ज़ुलै एकोणीसशे अडतीस); पण त्यांचे शिक्षण बनारसला आणि उच्च शिक्षण इंग्लंडमध्ये केंब्रिजला झाले. ब्रिटिश संशोधक (आणि विज्ञानकादंबरीकार) फ्रेड हॉयल यांचे ते सहकारी झाले आणि अंतराळविज्ञान, विश्वविज्ञान आणि ज़्योतिर्भौतिकी यांमधील त्या दोघांचे संशोधने सर्व जगात विव्दन्मान्य झाले. डॉ० नारळीकर गेली अकरा वर्षे मुंबईच्या ’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’मध्ये अध्यापन करीत आहेत. सध्या ते ’सैध्दांतिक ज्योतिर्भौतिक विभागा’चे प्रमुख आहेत. शिवाय भारतातील व परदेशातील अनेक विदयापीठांमधील व संशोधन केंद्रांमधील संशोधनकार्यात ते नेह्मीच सहभागी असतात.
please login to review product
no review added