गंगेच्या मनोहारी पाण्याची, गंगेच्या तीरावर असलेल्या स्वत:च्या घराची परिवाराची अनावर ओढ असलेला ब्रिजमोहन, अमेरिकेतले आधुनिक संपन्न जीवन सोडून जन्मभूमीकडे परततो. इम्युनॉलॉजीसारख्या विषयात पी.डी. केलेली आणि आपल्या कामात उत्तम पदी मग्न झालेली ब्रिजमोहनाची पत्नी सुचारिता निरूपायाने, ’उदित’ या लहानग्या मुलाबरोबर साथ देत भारतात येते. सुचरिताची आई एक शिक्षणसंस्था चालवणारी. वडील विचारवंत, मोठे लेखक, इतिहासाचे अभ्यासक. ब्रिजमोहनाचे घर शेती करणारे. सुखवस्तूपणाने राहणारे. उभयतांच्या घरच्या भिन्न-भिन्न पाश्र्वभूमीच्या विरोधाभासात आणि व्यक्तिगत भावनिक व्दंव्दात वेढल्या जाणा-या, नदीसारखी वळणे घेत जाणा-या आयुष्याची कहाणी ’सेतू’मध्ये प्रकटत जाते. माणसामाणसांमधल्या सूक्ष्म अशा भावभावनांचा वेध प्रगल्भपणे आशा बगे इथे घेतात. मान्वी जीवनातल्या गूढांचे, रहस्यांचे, अनपेक्षित अनुभवांचे मनोज्ञ दर्शन त्या ’सेतू’मध्ये घडवतात.
please login to review product
no review added