"नात्याचं भावस्पर्शी चित्रण गौरी देशपांडे ह्यांच्या परिचित लेखनाहून हे पुस्तक वेगळं आहे. कोवळ्या वयाच्या अविवाहित मुलीच्या अपत्याला आपण सांभाळून तिचं आयुष्य मार्गी लावणारे आई-वडील आणि तिच्या ह्या मुलीला स्वतःची मुलगी मानून तिचा स्वीकार करणारा नवरा ह्यांच्या प्रेमाचं मनोज्ञ दर्शन आणि शेजारच्या मैत्रिणीच्या साऱ्या कुटुंबाशी जुळलेले भावबंध, ह्या सगळ्याचं सुरेख,वाचकांना भावणारं चित्रण ह्या कादंबरीत आहे. ओघवत्या आणि जवळीक साधणाऱ्या भाषाशैलीनं पुस्तक वाचनीय झालं आहे."
please login to review product
no review added