मराठी साहित्यक्षेत्रात मैलाचा दगड ठरलेलं असं हे लोकप्रिय पुस्तक. त्यातलं गाव, त्यातली पात्रं, तिथलं वातावरण लेखकानं लहानपणी प्रत्यक्ष अनुभवलेलं. इथल्या वाडय़ावस्त्या, चोहीकडं पसरलेलं माळरान, तिथं वसलेली धनगरवाडी, मेंढरं आणि मेढपाळ ह्यांचं वर्णन, सोबतीला लेखकानं स्वतः काढलेली रेखाचित्रं कादंबरी जिवंत करतात.
please login to review product
no review added