पूर्वीही सामान्यतः ज्येष्ठ पुत्र हा समाजाचा प्रमुख अधिकारी होत असे. म्हणून ज्येष्ठत्व महत्वाचे ठरत असे. महाभारताच्या कालखंडातही ज्येष्ठत्व हा कळीचा मुद्दा ठरला होता. धृतराष्ट्र हा ज्येष्ठ पुत्र असूनही जन्मांध असल्यामुळे बाजूला सारला गेला. मात्र कनिष्ठ बंधू पंडू याच्या निधनानंतर पर्याय नसल्यामुळे विदुराऐवजी राजपदी धृतराष्ट्राची निवड झाली. त्याचा महत्त्वाकांक्षी पुत्र दुर्योधन कौरवांमध्ये असला तरी पंडूपुत्र युधिष्ठिर दुर्योधनाला ज्येष्ठ होता. स्वतःला ज्येष्ठ समजून धूत व अवधूत खेळण्याचा अविवेकी निर्णय घेणाऱ्या युधिष्ठिराला खूप उशिरा समजले कि तोही ज्येष्ठ कौंतेय नव्हता. पण हा केवळ ज्येष्ठत्वाचा सवाल नव्हता. महाभारतीय आणखीही महत्वाचे काही पणाला लागले होते. द्वापार युगातले मालवलेले युगधर्म आणि कलीच्या छायेतील नवे युगधर्मही ऐरणीवर होते. हा जसा युगांत होता तशी ही नव्या युगाची नांदीही होती. धर्मअधर्मही पारखले जाणार होते. सर्वसामान्य माणसाच्या जीवनातही या सर्वकष युद्धाने अनर्थ घडवले. या युद्धात जे हरले ते मेले आणि जे जिंकले ते खिळखिळे झाले. पण भारतीय युद्ध म्हणजे कौरव-पांडवांमधले वैर नव्हते. पांडवांच्या इतर पत्नीप्रमाणे इतरही अनेक उपेक्षित होते त्यांच्या व्यथाही तेवढ्याच महत्वाच्या होत्या.तत्कालीन समाजरचना,गुणगौरव, राजधर्म, आत्मसन्मान, राजेशाही असूनही व्यक्तीचे समाजातील महत्वाचे स्थान हेही सर्व पारखले जाणार होते. 'ज्येष्ठ'च्या निर्मितीमागे हेच महत्वाचे सूत्र आहे.
please login to review product
no review added