पोहरा हा आहे बालकाण्ड चा पुढला भाग! बालकाण्ड च्या शेवटी हनू चं शिक्षण सुरू झाल्याचं दिसतं. पोहरा मध्ये आहे हनू ची संघर्षमय शैक्षणिक यशोकथा, त्याच्या थोरल्या भावाची संघर्षमय संसारकथा आणि त्याच्या वडिलांची संघर्षमय शोककथा. आधुनिक शिक्षणाचा रस्ता सापडल्यावर हनुचं जगत विस्तारत जातं. या विस्ताराची प्रक्रिया त्याच्यात घडत असतानाच त्याला त्याचा स्व सापडत जातो. हनूच्या जगताच्या विस्ताराची आणि त्याला त्याचा स्व गवसण्याची प्रक्रिया हा पोहरा चा मुख्य विषय आहे.
please login to review product
no review added