बुधा नावाचा एक सामान्य पण तरीही एक ध्यास घेतलेला वनवासी आपल्या भोवतालच्या सृष्टीशी एकरूप होऊन तिच्यात कसा विलीन झाला - इतकी साधी अन एकमार्गी अशी ही कहाणी नाही. या कहाणीत एक मोठा ताण आहे. एका बाजूला सृष्टीशी तदाकार होण्याची माणसाची अनिवार ओढ अन दुसऱ्या बाजूला त्यामुळे निर्माण होणारा माणसाचा एकाकीपणा ह्यांमध्ये असा हा ताण आहे. आणि या ताणामुळे ह्या कादंबरीला एक विलक्षण वजन झाले आहे. ज्या एका आध्यात्मिक दृष्टीकोनाची म्हणा वा अनुभूतीची म्हणा, छाया संबंध कादंबरीभर पसरली आहे, ती म्हणजे माणूस आणि निसर्ग यांत कोणतेही आणि कसलेही द्वैत नाही, ही अद्वैताची भावना दांडेकर यांनी ' माचीवरला बुधा' या कादंबरीत सांगितली आहे.-विध्याधर पुंडलीक
please login to review product
no review added