.... नव्याच्या शोधात कुठेतरी जावंच लागतं किंवा जावं, अशी वळणं घेणं साधं नसतं ना पण...!''खरं आहे! अखेर अहंकार कुणालाच काबूत राखता येत नाही. पण थोडी उदार दृष्टी ठेवली तर काही अडचण येऊ नये,'..... आपल्यापैकी काहीजणांना एक स्वप्नातलं, कल्पित आयुष्य असतं. ते काही अंशी तरी पूर्ण होतं. मग कालांतरानं जे हवं होतं ते आपण सोडून देतो, कधी जगण्याच्या चाकोरीत विसरूनही जातो. पण काही माणसं वेगळी असतात त्यांना काही काळ भास होतो की, आपल्याला काहीतरी सापडत चाललं आहे...' • आयुष्याच्या तीन प्रहरातील हे संवाद प्रश्न उपस्थित करणारे आणि उत्तरेही शोधणारे, 'तीन प्रहर'मध्ये समाविष्ट असलेल्या दोन कादंबऱ्यांत हा शोध मनस्वीपणे घेतला आहे. तो वाचकांनाही अंतर्मुख करेल हे नि:संशय.
please login to review product
no review added