आपल्या लेखनाइतकेच गुढ गंभीर वलय जी ए कुलकर्णी यांच्या भोवती निर्माण झालेले होते. जी एच्या कथांचा अनेक अंगाने वेध घेतला जात असला तरी ते प्रत्यक्षात कसे होते यासंबंधी वाचकांना सातत्याने कुतुहल वाटत राहिले आहे. धारवाडला अनेक वर्ष जीए प्रभावती आणि नंदा या आपल्या मावस बहिणी सोबत राहत असत. पुढे नंदा पुण्याला आल्या या सुनीता पैठणकर म्हणून. त्यानंतर जीएनची अखेरची वर्ष पुण्यात गेली. नंदा पैठणकर यांनी आपल्या बाबू अण्णांचे रेखाटलेले हे हृद्य शब्दचित्र हा जीएनच्या चाहत्यांसाठी मौल्यवान ठेवा आहे. या चित्रणात नंदाताईंनी जीएन च्या लेखनाविषयी लिहिणे जाणीवपूर्वक टाळले आहे. "माझ्या लेखनातूनच मला शोधा" असा आग्रह धरणारे जे ए कुलकर्णी यांना एक कौटुंबिक बाजू होती. आपल्या या दोन्ही मावस बहिणींची जबाबदारी त्यांनी प्रेमाने स्वीकारली आणि समर्थपणे पार पाडली. ते एक उत्तम शिक्षक होते याचाही पडताळा पहिल्यांदाच या लेखनातून मिळतो. शेजारचा मुलगा आताऊल्ला याच्याशी जोडलेले नाते आणि त्यांनी लव बर्ड्स ची केलेली देखभाल यातून दिसणारे जीए तर विलक्षण विलोभनीय आहेत.
please login to review product
no review added