डॉक्टर एबन अलेक्झांडर हा एक अमेरिकन न्यूरोसर्जन होता. त्याला मेनिन्जायटिस होऊन तो आठवडाभर कोमात गेला. त्या काळात हा डॉक्टर किंवा त्याचे मन परलोकात गेले. त्याने तिथला प्रवास केला. तिथली अद्भुत भूमी पाहिली. तो सारा परिसर मंत्रमुग्ध करणार होता. ते एक अनोखे विश्व होते. आपल्याला अंतराळात दिसणारे विश्वच फक्त समजते. पण त्या विश्वाच्या मिती केवळ तीन नव्हत्या. तर अनेक होत्या. हा डॉक्टर परमेश्वराच्या प्रांतात जाऊन आला. आपल्या देहात परतल्यावर कालांतराने तो पूर्ण बरा झाला. आपल्याला जे दिसले ते आणि आपण जे अनुभवले ते खरोखरच एक सत्य होते का? परलोक असाच असतो का? यावर त्याने शास्त्रीय अभ्यास केला. अनेकांचे तशा प्रकारचे अनुभव गोळा करून वाचले आणि शेवटी "परलोक" हे एक सत्य आहे, या निष्कर्षाप्रत तो आला. हे पुस्तक म्हणजे त्यासंबंधीची एक अद्भुत कहाणी आहे, ती रोमहर्षक व सत्य आहे.
please login to review product
no review added