कुठल्याही घडलेल्या घटना, मनात आलेले विचार, पडलेली स्वप्नं, केलेली मनोराज्यं असं काही सांगायचं म्हटलं की त्यांना बांधणारी एक काळाची चौकट तयार होते; तसं काही विशेष कारण नसताना त्यांना एक सुसूत्रता येते; एक आधी घडलं, तर एक मागाहून, असा क्रम निर्माण होतो; गोष्टी जिथे घडल्या त्या ठिकाणाचं वैशिष्ट्य त्यांच्यात उतरतं; आणि तशातच व्यक्तींना नावं व रंगरूप दिलं की सांगणाऱ्या मनात असते त्याहून निराळीच आकृती ऎकणाऱ्याच्या डोळ्यांसमोर उभी राहते.
please login to review product
no review added